शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाभिमानी’ची रविवारी जिल्हा ‘बंद’ची हाक : ऊसदर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 23:16 IST

एफआरपीचे तुकडे पाडून ती तीन टप्प्यात देण्याचे कारखानदारांकडून षड्यंत्र रचले जात आहे. ते हाणून पाडण्याबरोबरच उसाला एफआरपी अधिक दोनशे रुपये मिळावेत, या मागणीसाठी रविवार दि. ११ नोव्हेंबर रोजी जिल्हा बंद व सर्व तालुक्यात रास्ता रोको

ठळक मुद्दे सर्व तालुक्यात रास्ता रोको; शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे जिल्ह्यातील शेतकºयांनी गाव बंद ठेवून शेजारच्या राज्य किंवा मुख्य मार्गावर होणाºया रास्ता रोको आंदोलनात सहभागी व्हावे

सांगली : एफआरपीचे तुकडे पाडून ती तीन टप्प्यात देण्याचे कारखानदारांकडून षड्यंत्र रचले जात आहे. ते हाणून पाडण्याबरोबरच उसाला एफआरपी अधिक दोनशे रुपये मिळावेत, या मागणीसाठी रविवार दि. ११ नोव्हेंबर रोजी जिल्हा बंद व सर्व तालुक्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे व संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास देशमुख यांनी दिली.

ते म्हणाले, तीन तुकड्यात एफआरपी देण्याचा जो घाट घातला जात आहे, त्याला आमचा विरोध आहे. याचे पडसाद आंदोलनात उमटलेले दिसतील. जिल्ह्यातील शेतकºयांनी गाव बंद ठेवून शेजारच्या राज्य किंवा मुख्य मार्गावर होणाºया रास्ता रोको आंदोलनात सहभागी व्हावे. गाव बंद, उसाची तोड बंद करुन शेतकºयांनी आंदोलनात सक्रिय व्हावे.

ते म्हणाले, गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात ऊस दरासाठी आंदोलन सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने बंद ठेवण्यात आले. मात्र सांगली जिल्ह्यातील एकही साखर कारखाना बंद ठेवला नाही. या कारखानदारांना जिल्ह्यातील एका मंत्र्यांचा पाठिंबा आहे. त्याच्या पाठबळामुळे पोलीसही दंडुक्याच्या जोरावर आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण आम्ही त्याला भीक घालत नाही. आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास, तेवढा उद्रेक होईल, हे पोलिसांनी लक्षात घ्यावे. सांगली, इस्लामपूर, तासगाव व शिराळा ही शहरे बंद ठेवून व्यापाºयांनी सहकार्य करावे.

आंदोलनाची ठिकाणे...रविवारी सकाळी नऊ वाजता आंदोलनाला सुरुवात होईल. सांगली-इस्लामपूर रस्त्यावर लक्ष्मी फाटा, पद्माळे फाटा, नांद्रे, कवठेएकंद, शिरढोण, पाचवा मैल, वसगडे, पलूस, अंकलखोप फाटा, म्हैसाळ उड्डाण पूल, आष्टा, वाळवा फाटा, इस्लामपूर, ताकारी, बहे, किल्लेमच्छिंद्रगड लाडेगाव फाटा, रेठरेधरण आणि जत या ठिकाणी रास्ता रोको होणार आहे. आंदोलनातून अत्यावश्यक सेवा वगळ्ण्यात आल्या आहेत.

टॅग्स :StrikeसंपFarmerशेतकरीRaju Shettyराजू शेट्टी